IPL 2023 हैदराबाद विरूध्द लखनऊची स्फोटक फलंदाजी…एकाच षटकात 5 षटकार..व्हिडिओ

0
25

IPL 2023 आयपीएलच्या ५८ व्या सामन्यात लखनऊच्या इनिंगमध्ये १६ व्या षटकात धावांचा पाऊस पडला. हैद्राबादने प्रथम फलंदाजी करून लखनऊसमोर विजयासाठी १८३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना लखनऊने १५ षटकात २ विकेट गमावत ११४ धावा केल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी लखनऊला ३० चेंडूत ६८ धावांची आवश्यकता होती. प्रेरक मंकड आणि मार्कस स्टॉयनिस खेळपट्टीवर असताना कर्णधार मार्करमने अभिषेक शर्माला १६ व्या षटकाची जबाबदारी दिली. त्यानंतर स्टॉयनिस आणि पूरनने धमाका केला.हैद्राबादला विजयासाठी ३० चेंडूत ६८ धावांची आवश्यकता होती. स्टॉयनिस आणि प्रेरक मंकडला आक्रमक फलंदाजी करायची होती. त्यावेळी कर्णधार मार्करमने अभिषेक शर्माला १६ व्या षटकाची जबाबदारी दिली अन् लखनऊने शर्मचा धुव्वा उडवत या षटकात ३१ धावा कुटल्या. स्टॉयनिसने २ तर निकोलस पूरनने तीन षटकार ठोकून सामन्याची रंगत वाढवली.


IPL 2023..मुंबई इंडियन्सचा ‘सूर्या’ तळपला… ‘त्या’ शॉटवर सचिन तेंडुलकरही झाला फिदा… व्हिडिओ