ISKCON कडून गायींची कत्तलखान्यात विक्री… मनेका गांधींचा गंभीर आरोप

0
55

भाजपा खासदार मनेका गांधी एका विधानामुळे त्या वादात सापडण्याची शक्यता आहे. इस्कॉनकडून गायींची कत्तलखान्यांना विक्री केली जाते, असा खळबळजनक आरोप मनेका गांधींनी केला आहे. त्यांचे हे आरोप चर्चेत आले असून त्यावर खुद्द ISKCON ट्रस्टनं सविस्तर उत्तर दिलं असून मनेका गांधींचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

मनेका गांधींच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. “मी तुम्हाला सांगते. देशातले सर्वात मोठे विश्वासघातकी कुणी असेल तर ते इस्कॉन आहे. ते गौशाला ठेवतात, त्याबदल्यात सरकारकडून बरेच फायदे मिळतात. मी हल्लीच त्यांच्या अनंतपूर गौशाळेत गेले होते. तिथे एकही साधी गाय नव्हती. सर्व दुभत्या गाई होत्या. तिथे एकही वासरू नव्हतं. याचा अर्थ सगळे विकले. ISKCON आपल्या सर्व गायी कत्तलखान्यात विकते. हेच रस्तोरस्ती हरे राम, हरे कृष्णा करत फिरत असतात. दूध-दूध म्हणत असतात. पण जेवढ्या गायी यांनी खाटिकांना विकल्या असतील, त्या कदाचित इतर कुणी विकल्या नसतील. जर हे असं करू शकतात, तर इतरांबद्दल काय बोलायचं?” असा आरोप मनेका गांधींनी केला आहे.

https://x.com/KanojiaPJ/status/1706641366279921720?s=20