ISRO चं यान उद्या सूर्याकडे झेपावणार!Aditya-L1 चा लाँच कुठे व कधी पाहाल लाईव्ह

0
22

चांद्रयान-3 च्या मोठ्या यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आता थेट सूर्याच्या अभ्यासासाठी एका मोठ्या अंतराळ मोहिमेची तयारी करत आहे. ISRO ने आदित्य-L1 सौर मोहिम लाँच करण्यासाठी शनिवारी (२ सप्टेंबर) ची तारीख निवडली आहे. आदित्य-L1 ही सूर्याच्या निरीक्षणासाठी इस्रोची पहिली समर्पित भारतीय अंतराळ मोहीम असेल.
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा आदित्य एल-१ हे यान अवकाशात झेपावणार आहे. पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता हे अवकाश यान लाँच केलं जाईल. या संपूर्ण उपक्रमाचे बजेट ४०० कोटींपर्यंत असणार आहे.
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले की, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या मोहिमेची प्रक्षेपणाची तालीम व अंतर्गत तपासणी पूर्ण झाली आहे. रॉकेट व सॅटेलाईट राऊत आहे. आम्ही तयार आहोत आणि आता फक्त उद्याच्या क्षणासाठी वाट पाहत आहोत. आदित्य एल1 सोलर मिशन इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जाईल.