12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो युवा वर्ग हा एचआयव्ही एड्स संदर्भात अधिक संवेदन शील असल्याने या वर्गामध्ये एचआयव्ही एड्स संदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे . त्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागाच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून युवा वर्गामध्ये एचआयव्ही एड्स जनजागृती करण्याच्या दृष्टीने वर्षभरात विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असतात . युवावर्ग सृजनशील असल्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचा सहभाग घेऊन त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे शक्य असते यासाठी या दिनाचे औचित्य साधून युवा वर्गाच्या मदतीने शहरात जनजागृती करिता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅली ही सकाळी 8.30 वाजता जिल्हा रुग्णालय या ठिकाणी माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वसंत जमदाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात येणार आहे सदर रॅली ही जिल्हा रुग्णालय – अप्पू हत्ती चौक न्यू आर्टस् सायन्स महाविद्यालय -सिद्धी बाग -दिल्ली दरवाजा व त्याच मार्गे परत येऊन जिल्हा रुग्णालयात समारोप केला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रत्येक घरी झेंडा हे अभियान तसेच एच आय व्ही एड्स जनजागृती करणे हे दोन्ही उद्देश समोर ठेवून सदर रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे यावर्षीचे युवा दिनाचे घोषवाक्य. Intergenerational solidarity आहे