सेवा पंधरवडा…भाजप आमदाराने स्वत:च्या हाताने स्वच्छ केले टॉयलेट…व्हायरल व्हिडिओ

0
422

मध्य प्रदेशाच्या रीवा मतदारसंघातून निवडून आलेले जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात मिश्रा चक्क हाताने कोणतेही ग्लोव्ह्ज न घालता टॉयलेट साफ करताना दिसत आहेत.

मिश्रा यांनी अचानक टॉयलेट साफ का करायला घेतलं यामागचं कारण ऐकून नेटकऱ्यांना विश्वासच बसत नाही आहे. पण बरं का अशा प्रकारे टॉयलेट साफ करण्याची मिश्रा यांची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी करोना काळातही मिश्रा यांनी कोविड केंद्रातील टॉयलेट घासून स्वच्छ केले होते, त्यावेळेस निदान त्यांनी ब्रश तरी वापरला होता पण यावेळेस मात्र ते चक्क हाताने टॉयलेट साफ करताना दिसत आहेत.

भाजप आमदारांचा आहे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यांनी स्वतः सुद्धा हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, ” पक्षाच्या सेवा सप्ताहाचा भाग होऊन युवक मोर्चा काढण्यात आला होता त्यात बालिका विद्यालयाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात याच विद्यालयतील शौचालयाची स्वच्छता केली”