शेवगाव – सध्या तालुक्यात जनशक्तीने चांदा ते बांधा आपली पकड मजबूत करण्याचे काम हाती घेतले असून इतर पक्षातील कार्यकर्त्याना गळ लावून जनशक्तीकडून पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे काम सुरु आहे.
आज दि.०५ रोजी जनशक्ती विकास आघाडीची कार्यकारिणीची बैठक शेवगाव येथे घेण्यात आली. यावेळी जनशक्तीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे, महासचिव जगन्नाथ दादा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चापडगावचे माजी चेअरमन राजू उर्फ जिजा पातकळ व लखमापूरीचे माजी सरपंच अशोक ढाकणे यांचा जनशक्ती विकास आघाडीमध्ये प्रवेश झाला असून यामुळे मुंगी गटात जनशक्तीची ताकद वाढणार आहे. या प्रवेशाने राजकीय पटलावर समिकरणे बदलताना दिसत आहेत. या बैठकीसाठी सौ.हर्षदाताई काकडे, देवराव दारकुंडे, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, शिवाजी औटी, कॉ.राम पोटफोडे, रामजी मडके, ज्ञानेश्वर फसले, रवींद्र कणके, अकबर भाई शेख. विश्वास ढाकणे, अमोल म्हस्के, भागवत रासनकर, शामराव खरात, लक्ष्मण पातकळ आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ॲड. काकडे म्हणाले की, येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये जनशक्ती ताकतीनिशी सर्व जागा लढवणार आहे. आता तालुक्यात गाव तिथे शाखा उपक्रम राबवणार आहोत. सर्वसामान्यांची आज विविध प्रश्नावरून अडवणूक होत आहे. ही गैरसोय दूर करण्याचे काम जनशक्तीचे कार्यकर्ते करणार आहेत. जनशक्तीच्या वतीने कार्यकर्त्यांना घडवण्याचे व जनशक्तीचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक शिबीर लवकरच आयोजित करणार आहोत. असेही ते म्हणाले.
तालुक्यात सर्व पक्षात काम केले. परंतु फक्त कार्यकर्त्यांचा वापर करून घेण्याची प्रवृत्ती पक्षांच्या नेत्यांमध्ये दिसली. जनशक्तीत नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो. त्यामुळे पक्षातील जुने व नवे अशा सर्वांनाच सोबत घेऊन तालुक्यात पक्षवाढीसाठी काम करणार आहे. :- राजेंद्र पातकळ.