Jio laptop…जिओने लॉंच केला आकर्षक फिचर्स असलेला लॅपटॉप

0
472

Jio laptop

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जीओने मोठा धमाका केला आहे. कंपनीने ‘जीओ बुक लॅपटॉप’ सादर केला आहे. या लॅपटॉपची किंमत सगळ्यात कमी असल्याचा दावा जीओने केला असून या जीओ बुकची भारतात विक्री सुरू झाली आहे. जीओ बुक आता रिलायन्स डिजिटलच्या स्टोअरमधून खरेदी करता येईल. यात अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत.

जीओ बुकमध्ये ११.६-इंचाचा डिस्प्ले आहे आणि त्याची बॅटरी १३ तासांची आहे. जीओ बुकमध्ये स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर देण्यात आला आहे. Adreno 610 GPU जीओ बुकमध्ये ग्राफिक्ससाठी उपलब्ध आहे आणि हत्याची कमाल घड्याळ गती २.0GHz आहे. जीओ बुकची बॉडी प्लास्टिकची असून त्यात ४जी सपोर्ट देण्यात आला आहे.

जीओ बुकला जीओ ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट आहे. यात LTE सपोर्ट दिले आहे. जीओ बुकमध्ये ३२ जीबी स्टोरेजसह २ जीबी रॅम आहे. Jio Book Chromebook सारखे दिसते. कीबोर्डमधील विंडोज बटणावर जीओ लिहिलेले असले तरी त्याच्यासोबत विंडोज कीबोर्ड उपलब्ध आहे. याचा पिक्सल रिझॉल्यून १३६६ x ७६८ आहे. हा लॅपटॉप ८ तासाच्या बॅटरी लाइफ सोबत येतो. महत्त्वाचे म्हणजे, हा लॅपटॉप, सिम कार्डवर देखील चालणार आहे.