Jio Recharge…. 219 रुपयांत जिओचा धमाकेदार प्लान, रोज 3 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग

0
27

Jio Recharge आयपीएल सीझन मध्ये यूजर्सला जास्त डेटाची गरज पडते. परंतु, जास्त डेटा प्लान महाग असतात. त्यामुळे जिओकडून यूजर्ससाठी २१९ रुपयाचा रिचार्ज प्लान आणला गेला आहे. या प्लानमध्ये यूजर्सला डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा दिली जाते. जिओच्या या प्लानमध्ये यूजर्सला डेली ३ जीबी डेटा ऑफर केले जाते. हा प्लान एकूण १४ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्रमाणे जिओ यूजर्सला या प्लानमध्ये एकूण ४४ जीबी डेटा मिळतो. यात डेली ३ जीबी डेटा आणि २ जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो. सोबत या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. सोबत हा प्लान डेली १०० फ्री SMS च्या सुविधेसोबत येतो. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही वर मूव्ही आणि शोज सोबत जिओ सिनेमा वर फ्री आयपीएल सुद्धा पाहू शकता.