Jio चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन… अनलिमिटेड कॉलींग

0
2661

Reliance Jio कडे १५५ रुपयांचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. ज्या लोकांना जास्त डेटाची गरज पडत नाही व केवळ अनलिमिटेड कॉलिंग हवे आहे, अशांसाठी हा प्लान चांगला आहे. परंतु, तुम्हाला जर जास्त डेटाची गरज पडत असल्यास तुम्ही दुसऱ्या प्रीपेड प्लान्सचा विचार करू शकता. हा २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा कंपनीचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे. यामध्ये तुम्हाला २८ दिवसांसाठी देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, एकूण ३०० एसएमएस देखील मिळतील.

१५५ रुपयांच्या या प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला एकूण २ जीबी हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळेल. हा डेटा समाप्त झाल्यास ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळतील. यात तुम्हाला Jio Cinema, Jio TV सारख्या जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल.