jio recharge plan जिओ कंपनीने एक २०२३ रुपयाचा प्लान उपलब्ध केला आहे. ज्यात रोज २.५ जीबी डेटा दिला जातो. सोबत यात २५२ दिवसाची वैधता सुद्धा मिळते.
एकदा रिचार्ज केल्यानंतर २५२ दिवसांपर्यंत टेन्शन फ्री राहता येते. पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही. एका दिवसाची किंमत काढल्यास जवळपास ८ रुपये होते. या प्लानमध्ये यूजर्सला संपूर्ण वैधते दरम्यान ६३० जीबी डेटा दिला जातो. यासोबत कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. सोबत १०० एसएमएस रोज दिले जाते. कंपनी जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा देत आहे. ज्यात JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चा समावेश आहे. या प्लानमध्ये देण्यात येणारा डेटा 5G यूजर्सला लागू पडतो.