प्रवाशांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रिक्षा चालकाचा भन्नाट जुगाड..Video

0
41

उन्हाच्या भीतीमुळे अनेकजण दिवसा घरातून बाहेर पडणं टाळत आहेत. तसेच दुपारच्या वेळी प्रवास करताना लोकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोक घरातून बाहेर पडताना उन्हापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे उपाय करताना दिसत आहेत. यासाठी कोणी टोपी घालून तर कोणी गॉगल घालून घराबाहेर पडत आहे. मात्र कडक उन्हात प्रवाशांना गारवा मिळावा यासाठी सध्या एका रिक्षा चालकाने अनोखा जुगाड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर आपणाला दररोज नवनवीन जुगाडाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही जुगाड खरोखर कौतुकास्पद असतात. जे पाहिल्यानंतर अनेक नेटकरी या जुगाडांचा अवलंब करण्याचाही प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये उन्हाचा त्रास कमी व्हावा यासाठी रिक्षाच्या मागे कुलर बसवल्याचं पाहायला मिळत आहे