नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नागापुर येथील शेतकऱ्यानं एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे. सुभाष निंबोरे असं या शेतकऱ्याचे नाव आहे.उत्पादन खर्च निघत नसल्यानं कांदा काढण्याचा निर्णय. कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. काही आपल्या शेतातील कांद्याचे पीकच काढून टाकत आहेत. कारण कांद्याला मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणं शक्य होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कर्जत तालुक्यातील नागापुर येथील शेतकरी सुभाष निंबोरे यांनी एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे.