कर्नाटकात भाजपाला मोठा धक्का, एक-दोन नव्हे तर तब्बल १३ मंत्री पराभूत

0
29

कर्नाटक विधानसबा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस आता कर्नाटकात बहुमताचं सरकार स्थापन करेल. कानडी जनतेनं भाजपा आणि जेडीएसऐवजी काँग्रेसच्या बाजूनै कौल दिला आहे. काँग्रेस कर्नाटकात १३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाला केवळ त्याच्या निम्म्या जागांवर आघाडी मिळाली आहे. कर्नाटकमधल्या जनतेनं सत्ताधारी भाजपाच्या अनेक आमदारांना आणि मंत्र्यांना यावेळी पसंती दर्शवली नाही. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बसवराज बोम्मई यांच्या सरकारमधील तब्बल १२ आमदारांचा पराभव निश्चित आहे.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची आज (१३ मे) मतमोजणी सुरू आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार कर्नाटकात काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ६४ आणि जेडीएसला केवळ २० जागांवर आघाडी मिळाली आहे. तसेच ४ जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
भाजपाचे १३ मंत्री पराभूत
१. मुधोला विधानसभा मतदार संघ
गोविंदा करजोला पराभूत, आरबी थिम्मापुरा विजयी

२. बेल्लारी ग्रामीण विधानसभा मतदार संघ

श्रीरामुलु पराभूत, बी नागेंद्र विजयी

३. वरुणा विधानसभा मतदार संघ
व्ही. सोमण्णा पराभूत, सिद्धारमैय्या विजयी

४. कामराजनगर विधानसभा मतदार संघ
वी सोमन्ना पराभूत, पुट्टारंगशेट्टी विजयी

५. चिक्कनायकनहल्ली विधानसभा मतदार संघ
जे. सी. मधुस्वामी पराभूत, सुरेश बाबू विजयी

६. बायलागी विधानसभा मतदार संघ
मुरुगेश निरानी पराभूत, जे. टी. पाटील विजयी

७. हिरेकेरुरु विधानसभा मतदार संघ
बी. सी. पाटील पराभूत, यूबी बनकर विजयी

८. चिक्काबल्लापूर विधानसभा मतदार संघ
डॉ. के. सुधाकर पराभूत, प्रदीप ईश्वर विजयी

९. होसकोटे विधानसभा मतदार संघ
एम.टी.बी. नागराज पराभूत, शरत बचेगौडा विजयी

१०. के. आर. पेट विधानसभा मतदार संघ
नारायणगौडा पराभूत, एच.टी. मंजू विजयी

११. तिपातूर विधानसभा मतदार संघ
बी. सी. नागेश पराभूत, के. शदाक्षरी विजयी
१२. येलबुर्गा विधानसभा मतदार संघ
हलप्पा अचार पराभूत, बसवराज रायरेड्डी विजयी

१३. नवलगुंडा विधानसभा मतदार संघ
शंकर मुनेकोप्पा पराभूत, एनएच कोनरेड्डी विजयी