कर्नाटकात मतमोजणी सुरू असतानाच भाजपा कार्यालयात घुसला साप, कार्यकर्त्यांची धांदल व्हिडीओ

0
29

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. सकाळपासून देशभरातील नागरिकांना कर्नाटकमध्ये कोणाचं सरकार येणार याची उत्सुकता लागली आहे. मतमोजणीत भाजपाचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत आहे तर काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. एकीकडे निवडणुकीत भाजपाच्या पराभवाच्या चर्चा सुरु असतानाच, कर्नाटकातील भाजपा कार्यालयात साप घुसल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा साप शिगगाव येथील भाजपा कार्यालयात घुसला होता. महत्वाची बाब म्हणजे हा साप भाजपा कार्यालयात घुसला तेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान या सापाची सुटका करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही अनर्थ घडला नाही. मात्र, हा साप दिसताच कार्यालयाच्या परिसारात एकच गोंधळ उडाल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे