Thursday, May 16, 2024

दंगलीतील हिंसाचारावेळी पोलिसाने असं काही धाडस दाखवले की…

राजस्थानच्या करौली शहरात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलीस हवालदार नेत्रेश शर्मा यांचा असा प्रकार पाहायला मिळाला, ज्याची प्रत्येकाला पोलिसांकडून अपेक्षा आहे. कॉन्स्टेबल नेत्रेशने आगीत अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावला.
करौली येथील दंगलीत घरे आणि दुकाने जाळण्यात आली होती. त्यापैकी एका ठिकाणी चार वर्षांच्या चिमुरडीसह महिला अडकल्या होत्या. करौली कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात कॉन्स्टेबल नेत्रेश शर्मा आगीच्या भक्ष्यस्थानी पोहोचले. 31 वर्षीय नेत्रेश शर्मा यांनी जीव धोक्यात घालून सर्वांचे प्राण वाचवले. कॉन्स्टेबल शर्मा यांनी मुलाला कपड्यात गुंडाळून उचलून सुखरूप बाहेर काढले. शर्मा यांच्या धाडसाचं सोशल मिडियात प्रचंड कौतुक होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles