राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांची संगमनेरमधील तिघांनी ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड नावाच्या कंपनीत पैसे गुंतवल्यानंतर दरमहा ४५ हजार ते ७० हजार रुपये मिळवा, असे अमिष दाखवून संगमनेरच्या तिघा जणांनी करुणा धनंजय मुंडे यांना ३० लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी श्रीमती मुंडे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती कोंची, पोस्ट निमगावजाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (दोघे ही राहणार घुलेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.






