22 लाखांची फसवणूक…करुणा धनंजय मुंडे यांच्यावर नगर जिल्ह्यात गुन्हा दाखल

0
608

पक्ष उभारणीसाठी घेतलेले रुपये आणि सोने परत न केल्याने, करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा यांच्याविरोधात शनिवारी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करुणा मुंडे यांनी २२ लाख ४५ हजार रुपये आणि १२ लाख रुपये किमतीचे सोने परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा (रा. ११०१, ६४, ग्रीन सांताक्रुझ वेस्ट, मुंबई) यांच्या विरुद्ध भारत संभाजी भोसले (४०, रा. कोंची, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाची मागणी केल्यावर ‘मैं अजय देडे को भेज तुमको खत्म करूंगी’ अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.