लाव डबल…विमान प्रवासातही त्याने भागवली तंबाखूची तल्लफ… video

0
33

देशी अंदाजात कुठेही तंबाखू खाणाऱ्या लोकांचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामध्ये ते कुठेही तंबाखू खाताना दिसतात. तर काही लोक तर तंबाखू खातानाचे रील देखील बनवतात. असाच हा व्हायरल होणारा व्हिडीओ आहे, जो नेटकरी मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. व्हिडीओमध्ये विमानातून प्रवास करणारा एक वयस्कर व्यक्ती तंबाखू खात असल्याचं दिसत आहे. तंबाखू खाऊन झाल्यावर तो चेहऱ्याला मास्कही लावताना दिसत आहे. शिवाय यावेळी विमानातील सर्व सीटवर प्रवासी बसल्याचंही पाहायला मिळत आहे.