रात्री झोपण्यापूर्वी गॅसवर आणि किचनमध्ये कांदे कापून ठेवा, आश्चर्यकारक फायदे… व्हिडिओ

0
367

कांदा सामान्यपणे आपण स्वयंपाकात वापरतो. पण कांद्याचा अनोखा असा वापर एका गृहिणीने दाखवला आहे. या गृहिणीने रात्री झोपण्याआधी कांदा गॅसवर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आता कांदा गॅसवर ठेवण्याचा काय फायदा आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिलेनं कांद्याच्या गोल चकत्या केल्या आहेत. त्या तिने गॅस आणि किचनवर पसरवून ठेवल्या आहेत. रात्रभर कांदे किचनवर असेच ठेवायचे आहेत. सकाळ झाली की ते उचलून किचन स्वच्छ पुसून घ्यायचा आहे.

या उपायामुळे किचनवर फिरणारे उंदीर, पाल, झुरळ असे प्राणी-कीटक किचनपासून दूर राहतील. असे जीव किचनवर फिरत राहिल्याने त्यांच्यापासून धोका आहे. पण कांद्याच्या उग्र वासामुळे उंदीर, पाल, झुरळ किचनकडे बिलकुल फिरकणार नाहीत. त्यामुळे यांच्यापासून असलेला धोका तुम्हाला टाळता येऊ शकतो, असं या गृहिणीने सांगितलं आहे.