किवी फळाचा वापर आइस्क्रीम, केक आणि पेस्ट्री इत्यादींवर जास्त केला जातो. कारण किवीची आंबट-गोड आणि रसाळ चव हे पदार्थ अधिक स्वादिष्ट बनवते. हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. विशेषत: ज्यांना डिहायड्रेशन आणि त्वचेतील कोरडेपणाची समस्या आहे त्यांनी हे सेवन केले पाहिजे. याबरोबरच हे फळ शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कारण या फळामध्ये पोटॅशियम भरपूर असते. रोज एक किवी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.