लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान…या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. विदेशातील अनेक नृत्यांगणा महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात, तिचा अभ्यास करतात. काळानुसार लावणी बदलत गेली. समृद्ध होत गेली. अलीकडच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजत आहे. अशाच दोन तरुणींची जबरदस्त लावणी सध्या व्हायरल होत आहे. या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घालत आहे.
लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणून लावणी ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. घुंगरांचे बोल…ढोलकीचा ताल…घायाळ अदा आणि लोककलेचा डौलदार लहेजा मिरवत या तरुणींनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे,या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता “अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी” या गाण्यावर या तरुणींनी ही भन्नाट अशी लावणी सादर केली आहे. यावेळी त्या फक्त लावणी करत नाहीयेत तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या आदाही आपल्याला भुरळ घालत आहेत. लावणीच्या बोलाप्रमाणे या तरुणी आपले हावभाव बदलत आहेत. या तरुणी चक्क नऊवारी नेसून डान्स करत आहेत. त्यांनी इतका अप्रतिम डान्स केलाय की जो पाहून प्रत्येकजण कौतुक करेल. या तरुणींचा डान्स, पेहराव आणि श्रृगांर पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. या तरुणींनीही असंच सादरीकरण केलं आहे.






