Lion King सिंहांच्या कळपाचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सिंहांसोबत सिंहिणही रस्त्यावरून जाताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. जंगलातून सिंहाचा कळप हायवेवर आल्यावर वाहनचालकांची एकच दमछाक उडाली. सिंहांना पाहताच वाऱ्याच्या वेगानं धावणारी वाहने चालकांनी काही सेकंदातच थांबवली. @lion_photo_ins नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर सिंहांच्या कळपाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एक खतरनाक कॅप्शनही देण्यात आलं आहे. “ही आहे खरी भीती,”अशाप्रकारचं कॅप्शन देण्यात आलं आहे.