हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी मॅगी हे कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही. हा मुलगा रात्री १२ वाजता अक्षरश: डान्स करत नूडल्स बनवतोय. त्यावेळी त्याचा हा डान्स मित्रानं गुपचूप आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. अन् आता हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @suri__sahab या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा तरुण शाहरूख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘दर्द-ए -डिस्को’ या गाण्यावर मॅगी करताना डान्स करतोय. तो अशा स्टेप्स मारतोय की ज्या पाहून खरंच हसू आवरणार नाही.