Mahakumbhmela 2025… प्रयागराजमध्ये आली एकेकाळी अभिनेत्री असलेली रूपसुंदरी साध्वी बनून

0
58

Mahakumbhmela 2025महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा मेळावा म्हणून ओळखला जातो. हा मेळावा १३ जानेवारी रोजी सुरू झाला असून पुढील ४५ दिवस चालणार आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभसाठी जगभरातील साधू आणि भाविक मंडळी हजेरी लावली आहे. साधारणपणे ३५ कोटी भाविक या कुंभमेळ्यात दर्शनासाठी येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एका साध्वीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या महिलेनं आपल्या भौतिक सुखाचा त्याग करून उर्वरीत आयुष्य इश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. पण नेटकरी तिची भक्ती नव्हे तर चक्क तिचं सौदर्य पाहून इंप्रेस झाले आहेत. होय, तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ @Babymishra_ या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये झळकणाऱ्या महिलेचं नाव हर्षा रिछारिया असं आहे. तिनं एक अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. पण आता ती साध्वी बनून कुंभमेळ्यात आली आहे.
व्हिडीओमध्ये साध्वीला कुंभमेळ्यात येण्याचं कारण विचारलं गेलंय. यावर ती म्हणाली, “मी उत्तराखंड येथून आले आहे. मी आचार्य महामंडलेश्वर यांची शिष्या आहे. माझं वय ३० आहे. अन् गेल्या २ वर्षांपासून मी साध्वी म्हणून आपलं आयुष्य जगतेय.” यावर महिला पत्रकारानं तिला साध्वी होण्याचं कारण विचारलं. कारण ती दिसायला फारच सुंदर आहे. शिवाय तिचं वय कमी आहे ती कुठल्याही क्षेत्रात चांगलं करिअर करू शकते. मग साध्वी बनून उर्वरीत आयुष्य जगण्याचा निर्णय का घेतला? यावर ती म्हणाली, तिला जे काही करायचं आहे ते सगळं तिनं केलेय. पण तिला आत्मिक शांतता मिळाली नाही. मात्र साध्वी झाल्यानंतर तिला अपेक्षित असलेलं आंतरिक सुख मिळत आहे अन् त्यामुळे तिनं साध्वी होण्याचा निर्णय घेतला.