महाराष्ट्र केसरीच्या निकाली कुस्त्यांनी अहिल्यानगरचे मैदान गाजले

0
68

महाराष्ट्र केसरीच्या निकाली कुस्त्यांनी अहिल्यानगरचे मैदान गाजले
*महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे अहिल्यानगरच्या वैभवात भर पडली -डॉ. बापू कांडेकर*
अहिल्यानगर-अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 800 ते 900 कुस्तीगीर सहभागी झालेले आहेत.या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.वाडियापार्क क्रीडा संकुलात अतिशय नियोजनबद्ध वातावरणात कुस्तींच्या स्पर्धा पार पडत आहेत.याचे सर्व श्रेय अहिल्यानगरचे लाडके आमदार संग्राम जगताप यांना जाते.महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे अहिल्यानगरच्या वैभवात भर पडली आहे.असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.बापू कांडेकर यांनी केले आहे.
वाडिया पार्क क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे दुसऱ्या दिवशी कुस्तीचे स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.बापू कांडेकर व डॉ.एस एस दीपक यांच्या हस्ते मल्लांची कुस्ती लावण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप,महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे खजिनदार शिवाजी चव्हाण, सचिव संतोष भुजबळ,उपमहाराष्ट्र केसरी पै.अनिल गुंजाळ,पैलवान मोहन गुंजाळ,पै.सुभाष लोंढे,प्रकाश भागानगरे,पै.संभाजी लोंढे, अजिंक्य गुरावे,पै.महेश लोंढे,ज्ञानेश्वर मामा रासकर,दादा पांडुळे,उत्तर महाराष्ट्र केसरी पै.युवराज करंजुले,कार्यालयीन प्रमुख निलेश मदने,संतोष लांडे,विशाल पवार,पैलवान मनोज फुले,वैभव ढाकणे ,सोनू घेबुड ,अतुल कावळे,निलेश हिंगे,नगरसेवक पै.शिवाजी कराळे,अजय आजबे,पोपट शिंदे,किरण निकम,उमेश भागानगरे आदींसह कुस्ती प्रेमी उपस्थित होते.
प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एस एस दीपक म्हणाले,अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे नियोजन आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दर्जाप्रमाणे उत्कृष्ट पद्धतीने केले जात आहे. तसेच या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीसांचा वर्षाव केला जात आहे.आमदार संग्राम जगताप यांनी कुस्ती या खेळाला मोठे प्रोत्साहन दिले आहे.प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कुस्ती स्पर्धेमुळे अहिल्यानगरच्या नावलौकिकात भर पडत आहे. यामुळे आमदार संग्राम जगताप यांना वस्ताद ही पदवी बहाल करावी.असे त्यांनी सांगितले.