निंबळक _नवनागापूर ( ता. नगर ) येथे महात्मा फुले प्रतिष्ठान च्या वतीने क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जंयती साजरी करण्यात आली .
समाजसेवक जालींवर बोरुडे याच्या हस्ते महात्मा फुले याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.जंयती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . बोरुडे यानी महात्मा फुले याच्या जीवनकार्य ची माहीती यावेळी दिली. फुले यांच्या कार्यामुळे समाजातील अनिष्ठ रुढी परापरां दूर झाल्या . माहिलांच्या हाती पुस्तके दिली शिक्षणाची दारे सर्वासाठी खुली केली असे बोरुडे यांनी यावेळी सांगीतले . या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, माजी सरपंच दत्ता पाटील सप्रे , डॉ. संजीव गडगे, आप्पासाहेब सप्रे , प्रमोद तुपे , गोरख गव्हाणे, माजी सरपंच सुशीला जगताप , योगेश गंलाडे, भैरवनाथ आदलिंग, नरेश शेळके , ज्ञानेश्वर आजबे, निलेश पुंड , तुकाराम तुपे, सागर चौरे, अशोक रासकर , रघुनाथ कोल्हे , महादेव सप्रे , राहुल नाईक , हेंमत लगड सह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते .