Mahindra Bolero Neo plus महिंद्रा आता आपल्या प्रसिद्ध महिंद्रा बोलेरो निओ प्लसचं अपडेटेड व्हर्जन बाजारात दाखल करण्याच्या तयारीत आहे. उपलब्ध माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात ही कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. गाडी TUV300 Plus चं फेसलिफ्ट व्हर्जन असणार आहे, जे फार कमी वेळासाठी सादर करण्यात आलं होतं. TUV300 Plus ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यात अयशस्वी ठरली होती. कारण त्यावेळी बाजारात BS6 इंजिन असणाऱ्या गाड्या बाजारावर आपली पकड मजबूत करत होत्या. TUV300 Plus तीन वर्षातच बंद करण्यात आली होती. पण आता कंपनी हेच मॉडेल Bolero Neo+ या नव्या नावाने बाजारात दाखल करत आहे. नव्या बोलेरो निओ प्लसमध्ये ग्राहकांनी जास्त सीट्स आणि जागा मिळणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीने या गाडीला दोन सीट कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 7 सीटर आणि 9 सीटरचा पर्याय असेल.