Mahindra New Bolero Neo
महिंद्रा अँड महिंद्राने जुलै 2021 मध्ये भारतीय बाजारपेठेत नवीन बोलेरो निओ सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च केली होती. सध्या या कारचे पाच व्हर्जन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कारची किंमत साधारण 9.29 लाख रुपयांपासून सुरु होते ती 11.78 लाख रुपयांपर्यंत आहे. या किंमती एक्स शोरूमच्या आहेत.
महिंद्रा आपली आगामी बोलेरो निओ सब-कॉम्पॅक्ट SUV नवीन मॉडेल लॉन्च करत आहे.
आगामी महिंद्रा बोलेरो निओ प्लस 7-सीट आणि 9-सीट कॉन्फिगरेशन ऑप्शन्ससह येईल. याबरोबरच लगेज एरियामध्ये साईड फेसिंग बेंच टाईप सीट देखील दिसेल. त्याच वेळी, नवीन बोलेरोची लांबी 4400 मिमी आणि रुंदी 1795 मिमी उंची 1812 मिमी असेल. त्याच वेळी, त्याचा व्हीलबेस 2680mm राहील. 5-सीटर व्हर्जनबद्दल बोलायचे झाल्यास, ते 3995 मिमी लांब, 1795 मिमी रुंद आणि 1817 मिमी उंच असेल. हे P4 आणि P10 ट्रिममध्ये लॉन्च केले जाईल.