Mahindra Scorpio नव्या रूपात, दमदार फिचर्स… टिझर व्हिडिओ जारी

0
3326

Mahindra Scorpio

महिंद्रा लवकरच भारतात ग्राहकांची आवडती स्कॉर्पिओ एसयूव्ही पूर्णपणे नवीन शैलीत सादर करणार आहे. नुकतंच कंपनीने कारचा एक नवीन टीझर व्हिडीओ जारी केला आहे, ज्यावर महिंद्रा ग्रुपचे सीईओ आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विट केले आहे. कंपनीने २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ म्हणजेच एसयूव्हीच्या जाहिरातीचा टीझर व्हिडिओ एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा बनवला आहे, जो पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “या एसयूव्हीमध्ये कोण कोणते फिचर्स आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेरलॉक होम्स होण्याची गरज नाही.”

आनंद महिंद्रा यांनी कंपनीने जारी केलेला व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले की, “यावेळी एक मोठा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. पण कोण कोणते फिचर्स आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेरलॉक होम्स होण्याची गरज नाही.” या एसयूव्हीच्या पहिल्या टीझरमध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.

नवीन स्पाय शॉट्समध्ये न्यू जनरेशन महिंद्रा स्कॉर्पिओच्या केबिनचे स्पष्ट फोटो समोर आले आहेत. नवीन २०२२ एसयूव्हीच्या केबिनमध्ये, कंपनीने टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ड्युअल टोन ब्लॅक आणि ब्राऊन इंटीरियर थीम, मोठ्या आकाराची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, सेंटर कन्सोलवर आडवे एसी व्हेंट्स, दुसऱ्या रांगेतील एसीसह फॅन स्पीड कंट्रोल दिला आहे. यासोबतच नवीन थ्री-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, फ्रंट डोअर स्पीकर, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.