गुटखा खाणाऱ्यांसाठी मार्केटमध्ये आला आइस्क्रीमचा नवा फ्लेवर, Video

0
23

गुटखाप्रेमींसाठी सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने आईस्क्रीममध्ये चक्क गुटखा मिसळून आइस्क्रीमचा नवा फ्लेवर तयार केला आहे.
ज्यांना सतत गुटखा चघळण्याची सवय आहे. जे दिवसाला गुटख्याची अनेक पाकिट चघळतात. त्यांना गुटखा खाऊ नका असे अनेकदा बजावूनही ते ही सवय सोडूत नाहीत. तंबाखू किंवा गुटख्याच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांबाबत सर्वांनाच माहिती आहे. त्याबाबत गुटख्याच्या पॅकेटवर एक गंभीर इशारा लिहिला असतो. मात्र त्यानंतरही लोक गुटखा चघळण्याची सवय सोडत नाहीत. या गुटखाप्रेमींसाठी आता रजनीगंधा फ्लेवरचे आईस्क्रीम बाजारात दाखल झाले आहे. या अनोख्या आइस्क्रीमचा व्हिडीओ पाहून अनेकांनाच धक्का बसला आहे.