सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करतात. यावेळी काहीजण व्हायरल होण्यासाठी नवनवीन आयडिया वापरतात, तर काही स्टंटबाजी करताना दिसतात. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती काहीतरी तुफानी करण्याच्या नादात थेट घरात बाईक घेऊन येत स्टंटबाजी करताना दिसत आहे. बाईकचे एक टायर हवेत उंचावत तो स्टंट करत असतो. यावेळी त्याच्याबरोबर अशी काही गोष्ट घडते, जी तो आयुष्यभर विसरणार नाही. व्हिडीओमध्ये दिसते की, स्टंट करत असताना बाईकचे पुढचे टायर टीव्हीला लागते आणि टीव्ही खाली पडून फुटतो. व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, घरामध्ये स्टंटबाजी करणे या व्यक्तीला किती महागात पडले असेल. कारण स्टंट दाखवणं हा लहान मुलांचा खेळ नाही, ज्यासाठी खूप मेहनत करावी लागते, खूप सराव आवश्यक असतो.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल video अति उत्साहीपणा नडला! चक्क घरात बाइक घेऊन करत होता स्टंटबाजी,पुढच्याच क्षणी….






