खतरनाक ! फुटबॉल खेळत दोरीवर केला अनोखा स्टंट, व्हिडीओ झाला व्हायरल…

0
42

आतापर्यंत तुम्ही अनेक ट्रेंकिंगचे व्हिडीओ पाहिले असतील; ज्यात उंचावरून विशिष्ट साधनांची मदत घेऊन अनेक प्रकारचे स्टंट करण्यात येतात. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्हाला तरुण एक वेगळाच स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ एखाद्या निसर्गरम्य डोंगराळ भागातील आहे. जिथे ट्रेकिंगसाठी रुंद ब्रिजला अनेक दोऱ्या लावलेल्या तुम्हाला दिसतील. तर उंच टेकड्यांच्या अगदी मधोमध एक तरुण अनवाणी पायाने दोरीवर चालतना तुम्हाला दिसेल. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एवढ्या उंचावर जाऊन हा तरुण दोरीवर अनवाणी पायाने चालता चालता, एक पाय हवेत ठेवून फुटबॉलसुद्धा खेळताना दिसत आहे; जे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. व्हिडीओतील तरुण केशरी रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची शॉर्ट्स, काळया रंगाची टोपी घालून हा स्टंट अगदी बिनधास्त करताना दिसत आहे. तसेच यादरम्यान तरुणाच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे हेसुद्धा व्हिडीओतून दिसून येत आहे.