marriage video.लग्नात नवरा-नवरीला पाहण्याशिवाय पाहुण्यांना उत्सुकता असते ती जेवणाची. काही लोकांचं लक्ष नवरा-नवरीशिवाय जेवणाकडेच जास्त असतं. याचाच प्रत्यय या व्हिडीओतून दिसत आहेत. ज्यात भरपावसात पाहुणे लग्नात जेवताना दिसले.
व्हिडीओत पाहू शकता मोकळ्या जागेवर मंडप घालण्यात आला आहे. तिथं पाहुणे जेवत आहेत. वरून धो धो पाऊस कोसळताना दिसतो आहे. आता असा पाऊस पडला की कुणीही जेवण सोडूनही पळेल. पण या वऱ्हाड्यांनी मात्र जेवणाचं ताट बिलकुल सोडलं नाही. तिथंच खुर्चीवर बसून ते जेवत होते.






