शिंदे गटाचे खासदार आणि आमदारा आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. विनायक राऊत यांचा हा दावा शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी खोडून काढला आहे. उलट ठाकरे गटाचे 12 आमदार आणि काही खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. कीर्तिकर यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. कीर्तिकर यांच्या या दाव्यामुळे ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणा






