Maruti Suzuki..‘या’ तीन कारवर एप्रिलमध्ये मोठा डिस्काउंट

0
1441

Maruti Suzuki

नवी दिल्ली :   मारुती सुझुकी इंडिया आपल्या ३ कार्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटचा फायदा एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल. डिस्काउंट उपलब्ध असलेल्या कारमध्ये Ignis, Ciaz आणि S-Cross चा समावेश आहे. मारुती सुझुकीच्या नेक्सा डीलरशिपवर मिळणाऱ्या गाड्यांवर एप्रिलमध्ये बंपर डिस्काउंट मिळत आहे. Maruti Ignis वर ग्राहक ३३ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकतात. मॅन्यूअल ट्रान्समिशन मॉडेलवर २० हजार रुपये कॅश डिस्काउंट मिळेल. याशिवाय, Ignis च्या सर्व मॉडेलवर १० हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि ३ हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट दिले जात आहे.

ऑटोमेटिक Ignis वर १३ हजार रुपयांचा फायदा हाईल.   एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटद्वारे १३ हजार रुपयांची बचत होईल. कंपनी आपली सेडान कार Maruti Ciaz वर देखील कोणतेही कॅश डिस्काउंट देत नाही. परंतु, ग्राहकांना यावर तब्बल २५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसचा फायदा मिळेल.

कंपनी Maruti S-Cross च्या Zeta ट्रिमवर एप्रिल महिन्यात बंपर डिस्काउंट देत आहे. यावर १७ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, कारवर २५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देखील दिले जात आहे. S-Cross च्या Zeta ट्रिम व्यतिरिक्त इतर मॉडेलवर देखील  १२ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे.