Maruti Suzuki Eeco Van मारुती सुझुकीच्या ओम्नी आणि इको या दोन व्हॅन भारतातल्या रस्त्यांवर रुबाबात मिरवत होत्या. मारुती इको या मिनी व्हॅनचे सध्याचे व्हेरियंट कंपनीने बंद केले आहे. कमर्शियल वाहन म्हणून या कारला मोठी मागणी आहे. आता या कारचं नवीन व्हेरिएंट दिवाळीच्या आसपास लाँच केलं जाऊ शकतं.
नवीन जनरेशन मारुती इको आधीच्या कारपेक्षा दमदार असेल. कारचं फ्रंट ग्रिल आणि बम्पर सध्याच्या कारसारखंच असेल. नवीन मॉडेलमध्ये फॉगलॅम्प दिले जाणार नाहीत. कार बॉक्सी डिझाईनमध्ये सादर केली जाईल. तसेच कारची मागची प्रोफाईलदेखील सध्याच्या मॉडेलसारखीच असेल. यात नवीन कलर ऑप्शन्स आणि ग्राफिक्स दिले जातील. सध्याचे इको मॉडेल सॉलिड व्हाइट, पर्ल मिडनाईट ब्लॅक, मेटॅलिक सिल्की सिल्व्हर, मेटॅलिक ग्लिस्टनिंग ग्रे आणि सेरुलियन ब्लू अशा रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहे.






