Maruti Suzuki Ertiga नवी दिल्ली: मारुती सुझुकी नवीन एर्टिगा फेसलिफ्ट लाँच करत आहे. मारुतीची सर्वात स्वस्त ७ सीटर MPV देखील त्याच्या फेसलिफ्ट अवतारमध्ये CNG पर्यायासह येईल. नवीन एर्टिगा फेसलिफ्टचे बुकिंगही काही दिवसांपासुन सुरू आहे. १५ एप्रिल रोजी लाँच होणार्या २०२२ नवीन मारुती एर्टिगा फेसलिफ्टचा लूक, डिझाइन, Exterior आणि Interior फीचर्सविषयी जाणून घ्या सविस्तर.
नवीन Maruti Suzuki Ertiga फेसलिफ्टच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले , तर या MPV मध्ये नवीन १.५ लीटर K15C Dualjet पेट्रोल इंजिन मिळेल. जे ११५ bhp पर्यंत पॉवर जनरेट करेल. त्याच वेळी, नवीन Ertiga च्या CNG Version मध्ये चांगली पॉवर आणि टॉर्क देखील दिसेल. ही MPV पर्ल मेटॅलिक आर्क्टिक व्हाईट, स्प्लेंडिड सिल्व्हर, ऑबर्न रेड, मॅग्मा ग्रे, प्राइम ऑक्सफर्ड ब्लू, पर्ल मेटॅलिक डिग्निटी यांसारख्या ७ कलर पर्यायांमध्ये ऑफर केली जाईल.
नव्याने डिझाइन केलेल्या MPV मध्ये नवीन बंपर तसेच उत्तम हेडलाइट्स आणि टेललाइट्स मिळतील. मारुती सुझुकी नवीन एर्टिगाच्या Exterior भागामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, फीचर्सच्या बाबतीत, २०२२ मारुती एर्टिगा फेसलिफ्टमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्टसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, क्रोम अॅक्सेंट, वुडन फिनिश डॅशबोर्ड आणि लेदर रॅप्ड फ्लॅट बॉटम मल्टी फंक्शनल स्टीयरिंग यासारखी फीचर्स मिळतील.
Let's #BringBackTogether with ease and style. Introducing the #NextGenErtiga that comes with Suzuki Connect Technology and 17.78cm Smartplay Pro. Are you ready to experience fun the old way? pic.twitter.com/U1mHHqg7Nd
— Maruti Suzuki Arena (@MSArenaOfficial) April 15, 2022