Maruti Suzuki Grand Vitara..लवकरच रस्त्यावर..बुकिंग साठी मोठी झुंबड

5
3303

Maruti Suzuki Grand Vitara मारुती सुझुकी लवकरच एक नवीन कार लाँच करणार आहे. कंपनीने ग्रँड विटाराची झलक आधीच दाखवली असून बुकिंगही सुरू झाले आहे. ही कंपनीची मध्यम आकाराची एसयूव्ही असून जुलैमध्ये सादर करण्यात आली होती. मात्र, या कारचे अधिकृत लाँचिंग या महिन्याच्या अखेरीस होणार आहे.

मारुतीच्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी ५३ हजाराहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. विशेष बाब म्हणजे, या बुकींगमधील २२ हजार हे स्ट्राँग हायब्रिड व्हेरियंटसाठी आहेत. तथापि, माईल्ड-हायब्रीड व्हेरियंटसाठी बुकिंग मोठ्या प्रमाणावर आहे. या एसयूव्हीमध्ये तुम्हाला २८ किमीपर्यंत मायलेज मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.