Home ब्रेकिंग न्यूज आमचे चिन्ह व नाव… मिलिंद नार्वेकर यांनी शेअर केला फोटो

आमचे चिन्ह व नाव… मिलिंद नार्वेकर यांनी शेअर केला फोटो

0
1700

: अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. एकीकडे शिंदे गटाकडून रिक्षा चिन्ह व्हायरल झालं आहे तर शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी वाघाचा फोटो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असं फोटो शेअर करून हे आमचे चिन्ह असं ट्वीट केलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला आता नाव वापरता येणार आहे पण चिन्ह वापरता येणार नाही. याबद्दल मिलिंद नार्वेकर यांनी सूचक ट्वीट केलं आहे.
नार्वेकर यांनी वाघाचा फोटो शेअर केला आहे. त्यावर आमचे चिन्ह श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख आहे. त्यामुळे शिवसेना गटाचं चिन्ह वाघ असणार आहे, का अशी चर्चा रंगली आहे. तसंच शिवसेनेच्या नावापुढे शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे) असा उल्लेख असणार आहे का, असे संकेतही त्यांनी दिले.