भारतीय जनता पक्ष, संगमनेर तालुक्याच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पेढेतुला कार्यक्रम आणि नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त मोटार सायकल रॅली काढून कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शनही केले.
प्रांरभी तालुक्याचे आराध्य दैवत समनापूरच्या महागणपतीचे आणि सय्यबाबा दर्ग्याचे दर्शन घेतले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी जेष्ठ नेते श्री. वसंतराव गुंजाळ, श्री. वसंतराव देशमुख, डॉ. भानूदास डेरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. श्री. अशोक इथापे, शहर अध्यक्ष श्री. श्रीराम गणपुले, श्री. सतिष कानवडे, श्री. जावेद जहागिरदार, श्री. अमोल खताळ, श्री. सतिष कानवडे, श्री. शिवाजीराव धुमाळ, श्री. सोनाली नाईकवाडी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.