पाथर्डी, सोलापूर, शिर्डी रस्त्याची दुरवस्था, राष्ट्रवादीच्या आमदारांचा उपोषणाचा इशारा

0
640

जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसणार..!
मनमाड,पाथर्डी व सोलापूर या तीन ही महत्वाच्या राष्ट्रीय मार्गाची गेल्या दोन वर्षापासून झालेली दुरावस्था यामुळे या तीन ही महत्वाच्या रस्त्यावर झालेले जीवघेणे अपघात,या रस्त्यावरून सातत्याने वावरणारे नागरीक, शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थी,शेतकरी,नोकरदार वर्ग आदींसह सर्व जनता त्रस्त झाली आहे.मी वारंवार सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तीनही रस्त्याच्या कामा बाबत पाठपुरावा करूनही हे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने येत्या ७ डिसेंबर पासून सर्वसामान्य जनता व लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना दिले अशी माहिती आ.निलेश लंके यांनी दिली.

मनमाड,पाथर्डी व सोलापूर या तीनही रस्त्यांच्या कामा बाबत मी स्वतः गेल्या दोन अडीच वर्षापासून काम होण्याबाबत पाठपुरावा करत आहे.संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याची दखल घेतली नाही ही बाब अतिशय खेदजनक आहे.अहमदनगर-पाथर्डी-नांदेड या निर्मल रस्त्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले आहे.सदरचा रस्ता शेवगाव,पाथर्डी या मुख्यालयांसह राज्यभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र मोहटादेवी,श्री क्षेत्र कानिफनाथ गड,पैठण येथे जाणारा मुख्य रस्ता आहे.या बाबत संबधित विभागाचे अधिकारी गंभीर नसून ते या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत.
मनमाड रस्ता हा राहुरी,संगमनेर,शिर्डी,कोपरगाव,श्रीरामपूर, राहता ही तालुके अहमदनगर शी जोडणारा मुख्य रस्ता आहे. तसेच सोलापूर रस्त्यावरील मिरजगाव, कर्जत, करमाळा, राशीन, टेंभूर्णी असा पुणे- सोलापूर रस्त्यास मिळतो. उत्तर महाराष्ट्रातील, खान्देश, मराठवाड्यातील वारीला जाणारे जाणारे भाविक या रस्त्याच्या पालखी मार्गाने पंढरपूरकडे जात असतात. शिवाय या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूकही सुरू असते. यामुळे होणाऱ्या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.या बाबत आजपर्यंत कोणीही गांभिर्यपूर्वक दखल घेतलेली नाही.या बाबत सर्वसामान्य नागरिक रोज माझ्याशी याबाबत तक्रारी करत आहेत. मी सामान्य नागरिकांचा लोकप्रतिनिधी या नात्याने काहीच कार्यवाही करू शकलो नाही याची मला खंत वाटते. स्थानिक लोकप्रतिनीधींना हे मग्रूर अधिकारी टोलवा टोलवीची उत्तरे देतात.राष्ट्रिय महामार्ग विभागाचे मुख्य अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करूनही अद्याप काहीच कार्यवाही होत नसल्याने मी निवेदन दिल्यापासून सात दिवसांनी बुधवार ता.७ डिसेंबरला सामान्य जनतेसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहे
या वेळी आमदार रोहितदादा पवार,क्षितीज घुले, शिवशंकर राजळे,राष्ट्रवादी चे नेते घनश्‍याम आण्णा शेलार,रफीक शेख,बंडू बोरूडे,ॲड.हरिहर गर्जे,राजेंद्र दौंड,चांद मनियार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.