सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील गुन्हेगारास नगर जिल्ह्यात अटक !

0
1906

गायक व काँग्रेस पक्षाचे नेते सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात संशयित असलेल्या पुणे जिल्ह्यातील दोघांपैकी एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुणे नगर सीमेवरील बोटा शिवारात बेड्या ठोकल्या.

हत्याप्रकरणातील संशयित संतोष जाधव याचा साथीदार सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (वय-19) असे त्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (7 जून) रोजी करण्यात आली. सिद्धु मुसेवाला हे 29 मे रोजी त्यांच्या सहकार्‍यांसह पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावातून त्यांच्या कारमधून जात होते.

त्यावेळी त्यांचा पाठलाग करीत टोळक्याने त्यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. या घटनेचे पंजाबमध्ये तीव्र पडसाद उमटले असतानाच, केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाचा तपास स्वतंत्र पथकामार्फत करण्याचा आदेश दिला होता.
मात्र पंजाबचे प्रसिद्ध गायक खुन प्रकरणात संशयित गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुणे नगर सीमेवरील बोटा शिवारात बेड्या ठोकल्याने बोटा परिसरात खळबळ उडाली आहे.