शक्तीशाली भारतीयांच्या यादीत पंतप्रधान मोदीच नंबर १ तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

0
813

PM Modi, Most Powerful Indian…इंडियन एक्सप्रेस समूहाने २०२२ मधल्या १०० शक्तिशाली भारतीयांच्या यादी जाहीर केली आहे. यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ९ व्या तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या यादीत १६ व्या क्रमांकावर आहेत.

पंतप्रधान मोदींच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तर चौथ्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आहेत. तर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत मुख्यमंत्री झालेले योगी आदित्यनाथ सहाव्या क्रमांकावर असून उद्योगपती गौतम अदानी सातव्या क्रमांकावर आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आठव्या क्रमांकावर आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवव्या आणि देशाच्या अर्थंमंत्री निर्मला सीतारामण दहाव्या क्रमांकावर आहेत.

शक्तिशाली भारतीयांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १६ व्या स्थानावर असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १७ व्या स्थानावर आहेत.