राहुल गांधींचा बाणेदारपणा…केंद्र सरकारची ‘ती’ ऑफर नाकारली…

0
27

काँग्रेसचे नेते राहुल गांधींना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आल्यानंतर ते पावसाळी अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आल्यानंतर आता राहुल गांधींना त्यांचा 12 तुगलक लेनमधील बंगला खासदार म्हणून पुन्हा सुपूर्द करण्यात आला. मात्र आता राहुल गांधींनी सरकारने दिलेली ही ऑफर नाकारली असून जुना बंगला पुन्हा घेण्यास नकार दिला आहे. नियमानुसार राहुल यांना खासदारी रद्द झाल्यानंतर हा बंगला त्यांच्याकून काढून घेण्यात आला. हाच बंगला पुन्हा त्यांना देण्यात आला होता मात्र त्यांनी तो नाकारला आहे, असं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. मध्यंतरी राहुल गांधींना सरकारी बंगल्यासंदर्भात विचारलं असता त्यांनी, “संपूर्ण देशच माझं घर आहे,” असं उत्तर दिलेलं.