“आयुष्यभरासाठी साथ देईल तो जोडीदार खरा, शीतलचं नाव घेतो सर्वांनी वीजबील भरा आणि सहकार्य करा.”, अशा हुखाणा घेत विजबिल भरण्याचं नागरिकांना आवाहन करणाऱ्या महावितरणचे सहाय्यक अभियंता अतुल पैठणकर यांची तुफान चर्चा सुरु आहे. अतुल पैठणकर यांच्या लग्नाचा व्हिडीओ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, महावितरण कर्मचाऱ्याचे “शुभ कार्य”! नांदगाव येथे कार्यरत असलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता अतुल पैठणकर यांनी लग्नाच्या मंगल प्रसंगी उखाण्याच्या माध्यमातून केली जनजागृती! आपणही जरूर ऐका…अशाप्रकारे अतुल पैठणकर यांनी हुखाण्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून हजारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.
महावितरण कर्मचाऱ्याचे "शुभ कार्य"!
नांदगाव येथे कार्यरत असलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता अतुल पैठणकर यांनी लग्नाच्या मंगल प्रसंगी उखाण्याच्या माध्यमातून केली जनजागृती!
आपणही जरूर ऐका…#AlwaysOnDuty #SpreadingAwareness pic.twitter.com/2XDjLmlTNw
— Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@MSEDCL) February 24, 2023






