Mughal garden..मोठा निर्णय….राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’चे नामांतर…

0
26

Mughal Garden
राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव आता बदलण्यात आले आहे. मुघल गार्डनचं नाव बदलून ‘अमृत उद्यान’ असं ठेवण्यात आलं आहे. देशाच्या अमृत ​​महोत्सवानिमित्त मुघल गार्डनचे नामकरण करण्यात आले आहे. हे गार्डन फुलांच्या विशेष विविधतेसाठी ओळखली जाते. राष्ट्रपती भवनाचे हे गार्डन आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हे गार्डन पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात या गार्डनमध्ये 138 प्रकारच्या गुलाबांची लागवड करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींच्या माध्यम उपसचिव नाविका गुप्ता यांनी मुघल गार्डनच्या नामांतराची माहिती दिली. ते म्हणाले की, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनाच्या गार्डनला ‘अमृत उद्यान’ असे सामान्य नाव दिले आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. यंदा पावसाळ्यातही हे गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना वर्षातून दोनदा अमृत उद्यानात जाता येणार आहे. यावेळी अमृत उद्यानात ट्युलिप्सच्या 12 प्रकारांची फुले पाहायला मिळणार आहेत. इतकंच नाही तर फुलांसमोर QR कोड लावण्यात येणार आहेत. हे क्यूआर कोड स्कॅन करून सर्वसामान्यांना फुलांची माहिती मिळू शकेल.

advt