.
रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला. राधिका ही उद्योगपती विरेन आणि शैला मर्चंट यांची कन्या आहे.
राजस्थानच्या नाथद्वारमधल्या श्रीनाथजी मंदिरात हा सोहळा पार पडल्याचं रिलायन्सच्या वतीने जारी प्रसिद्धिपत्रकात सांगण्यात आलं. अनंत सध्या जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल वेंचर्सच्या बोर्डचा सदस्य आहे तर राधिका ही ऑनकोर हेल्थकेअरच्या संचालक मंडळात आहे.
.






