लोकसभा निवडणूक…. भाजपने खाते उघडले…एक उमेदवार बिनविरोध…

0
13

दिल्ली : गुजरातच्या सुरत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी तसेच, पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्यानंतर अन्य ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यावर काँग्रेसने घणाघाती टीका केली असून पराभवाच्या भीतीने ‘मॅचफिक्सिंग’ करण्यात आल्याचा आरोप केला.

गुजरातमधील २६ जागांसाठी ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सोमवार २२ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेर दिवस होता. काँग्रेसचे निलेश कुंभोणी यांच्या तीन अनुमोदकांनी

आपण अनुमोदक नसल्याचे प्रतिज्ञापत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिले. कुंभोणी यांनी तीनही अनुमोदकांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ते गैरहजर राहिले. त्यानंतर त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. कुंभोणी यांनी आपल्या अनुमोदकांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे काँग्रेसने याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचे चार अनुमोदक स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचा दावा करतात. अन्य पक्षांचे उमेदवार, अपक्ष आपली उमेदवारी मागे घेतात. हा योगायोग नव्हे. त्यामुळे सुरतमधील निवडणुकीला स्थगिती देऊन नव्याने निवडणूक घ्यावी, अशी लेखी मागणी करण्यात आल्याचे काँग्रेस प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केले.