Video: आत्महत्येचा प्रयत्न! रेल्वे येताच पुलावरुन थेट रुळावर उडी मारली अन्…

0
15

सध्याची तरुणाई अगदी छोट्या छोट्या कारणांवरुन, अपयशाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. सोशल मीडियावर अशा अनेक बातम्या, धक्कादायक व्हिडिओ समोर येत असतात. सध्या मुंबईमधील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. सुदैवाने भाईंदर रेल्वे स्थानकावरील रेल्वे संरक्षण दल आणि पश्चिम रेल्वेच्या जवानांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला.समोर आलेल्या माहितीनुसार, भाईंदर येथील पुलावरुन रेल्वे रुळावर उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. मात्र भाईंदर रेल्वे स्थानकावरील रेल्वे संरक्षण दल आणि पश्चिम रेल्वेच्या जवानांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला. तरुणाने उडी मारताच आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आणि पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या तरुणाला रेल्वे रुळावरून बाजूला ओढले. जवानांच्या सतर्कतेमुळेच तो ट्रेनखाली जाण्यापासून वाचला