शरद पवारांना नागालॅण्ड मध्येही धक्का, पक्षाचे ७ आमदार अजित पवारांकडे

0
32

नागालँडच्या राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. सात आमदार त्यांचे पदाधिकारी हे सगळे अजित पवारांना पाठिंबा देणार हे नक्की झालं आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. नागालँडचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग यांनी दिल्लीत येऊन प्रफुल्ल पटेल यांची आणि महाराष्ट्रात येऊन सुनील तटकरेंची भेट घेतली. त्यानंतर या निर्णयाची माहिती देण्यात आली. शरद पवारांसमोर पक्ष बांधणीचं आव्हान आहे अशात नागालँडचे सात आमदार अजित पवार गटात आल्याने त्यांना आता आणखी तयारी करावी लागणार आहे.